Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील ४६ व्या सत्रात लता शेंद्रे विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४६ व्या सत्रात लता शेंद्रे विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे ४६ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३३ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवयित्री लता शिशुपाल शेंद्रे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “वर्षावास” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
लता शिशुपाल शेंद्रे हे गडचिरोली येथील नवोदित कवयित्री असून अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी दिडशेच्या वर कवितांचे लेखन केले आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित ‘रानगर्भ फुलत आहे’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या दोन कवितांचा समावेश आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ४६ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.पंढरी बनसोडे,तुळशीराम उंदीरवाडे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,रोहिणी अमोल पराडकर,सोनाली रायपुरे- सहारे,राजरत्न पेटकर,उकंडराव नारायण राऊत,रेखा दिक्षित,यामिनी मडावी,पुनाजी कोटरंगे,पी.डी. काटकर,संगिता ठलाल,शैला चिमड्यालवार,सुनील चडगुलवार,चरणदास वैरागडे,मुर्लीधर खोटेले,  जयराम धोंगडे,लता शेंद्रे,वंदना सोरते,ज्योत्स्ना बंसोड, पुरुषोत्तम दहिकर,मधुकर दुफारे, वामनदादा गेडाम, ज्योती म्हस्के, संतोष कपाले,संगीता रामटेके,वंदना मडावी,प्रिती ईश्वर चहांदे,सुभाष धाराशिवकर,सुजाता अवचट,खुशाल म्हशाखेत्री,डॉ.मंदा पडवेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!