Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाअन् 'त्या' पोलीस शिपायाने स्वतःवरच झाडली गोळी.. - पोलिस कर्मचारी बहिणीला व्हॉट्सॲप...

अन् ‘त्या’ पोलीस शिपायाने स्वतःवरच झाडली गोळी.. – पोलिस कर्मचारी बहिणीला व्हॉट्सॲप मॅसेज करीत पीएसआयसह तिघांची टाकली नावे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-कर्तव्य बजावत असतांना तणावात असलेल्या एका पोलिसाने स्वतःच्या एसएलआर रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल,रविवारी १७ नोव्हेंबरच्या सायंकाळी गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर घडली.राकेश पांडुरंग भांडारकर वय ३७ वर्षे,रा.पदमपूर,ता. आमगाव,जि.गोंदिया असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

राकेश भांडारकर हे दोन ते तीन वर्षांपासून बिरसी विमानतळावर कर्तव्यावर आहेत.काल रविवारी पाइंटवर ड्यूटी करीत असतांना तेथील अधिकारी व काही सहकारी त्यांना इकडे-तिकडे पाठवित मानसिक त्रास देत होते.वारंवारच्या त्रासामुळे तणावात आलेल्या राकेश यांनी स्वतः जवळील असलेल्या एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
राकेश भांडारकर यांची बहीण अरुणा भांडारकर यादेखील गोंदिया पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.राकेशने काल दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी आपल्या बहिणीच्या मोबाइलवर एक व्हॉट्सॲप मॅसेज पाठविला राखीव लोक असतांना मला पाइंटवरून बोलावत आहेत.माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत,असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांची नावे टाकली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!