- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना संघ मुख्यालयाजवळच्या चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी कमळाचे झेंडे दाखवले.प्रत्युत्तरात प्रियांका गांधी यांनी झेंडे दाखवणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.मात्र,काहीही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे वक्तव्यही झेंडे दाखविणाऱ्यांना त्यांनी केले. बडकस चौकात घडलेली ही घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे.मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.
काल,रविवारी सायंकाळी महालमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रियांका गांधी यांनी अभिवादन केले.त्यानंतर रोड शोला सुरुवात झाली. प्रचार रथावर प्रियांका गांधी यांच्यासोबत उमेदवार बंटी शेळके,काँग्रेस नेते,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल कोटेचा,माजी मंत्री अनिस अहमद,पूर्व नागपूरचे उमेदवार दुनेश्वर पेठे आदी उपस्थित होते.कोतवाली चौक,केळीबाग मार्गाने अलोट गर्दीचे अभिवादन स्वीकारत प्रियांका गांधी पुढे जात होत्या.सायंकाळी ५:४०च्या सुमारास रॅली बडकस चौकात आली.येथे न्यू आदर्श मिष्ठान्न भंडारच्या इमारतीच्या स्लॅबवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते.त्यांनी प्रियांका यांना भाजपाचे झेंडे दाखविले.ते पाहून प्रियांका यांनी त्यांना नमस्कार केला.तसेच माईक हातात घेऊन ‘ झेंडे’ दाखवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.मात्र,काही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार,’ असे वक्तव्य त्यांनी केले.
त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपाचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते.त्यांनी तिथेच थांबून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.प्रचंड संख्येत असलेल्या पोलिसांनी मोर्चा सांभाळून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना वेगळे करून घोषणाबाजी बंद करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते जुमानत नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली.दरम्यान,१५ मिनिटांनंतर वातावरण शांत झाले.
प्रियांका गांधी यांचा ‘रोड शो’चा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ३:३० वाजता सुरू होणार,असे जाहीर करण्यात आले होते.चौकाचौकात आधीपासूनच मोठ्या संख्येत कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.मात्र,तब्बल २ तास विलंबाने हा रोड शो सुरू झाला.रॅली बडकस चौकात येताच येथून विशेष सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात त्या आपल्या वाहनात बसल्या आणि पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.
- Advertisement -

