Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीगुलाबी थंडीची चाहूल; त्वचेची काळजी घेणे आवश्यक...

गुलाबी थंडीची चाहूल; त्वचेची काळजी घेणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात आता थंडीची चाहूल
लागली आहे.त्यामुळे आंघोळीनंतर मॉश्चरायझर लावल्याने त्वचेमधील पाणी साठवून ठेवण्यास जास्त मदत होते.ज्यांची त्वचा नाजूक आणि संवेदनशील आहे,त्यांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.विशेषतः ज्यांना आधीच त्वचेचे आजार आहेत जसे की,सोरायसिस किंवा अटोपिक डर्माटायटिस यांनी सुद्धा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.सध्या वातावरणातील हे बदल नैसर्गिक आणि आल्हाददायक जरी असले,तरी या बदलत्या मोसमाचा परिणाम शरीरावर,पर्यायाने त्वचेवरसुद्धा होतो. थंडीच्या दिवसांत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते आणि म्हणून त्वचेतील पाणी शोषले जाऊन त्वचा कोरडी होते.त्वचेवर खाज येणे किंवा त्वचा रुक्ष होणे, असे प्रकार घड्डू शकतात.त्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे,शिवाय खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल किंवा जास्तच कोरडी त्वचा असेल,तर एखादा मॉश्चरायझर लावणे गरजेचे असते.अतिशय थंड पाण्याचा वापर टाळावा,कोमट गरम पाण्याने आंघोळ करावी,असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
त्वचेत कोरडेपणा वाढल्यास सोरायसिस या आजाराची लक्षणेही वाढू शकतात.या आजारात शरीरावर लाल डाग विशेषतः हातापायांचे कोपरे, पाठीवर आणि डोक्यावर येतात.चांदीच्या रंगाच्या खपली या डागांमधून निघते.खाज जरी जास्त नसली, तरी थंडीमध्ये खाजेचे प्रमाण वाढते.हा आजार फक्त त्वचेपुरताच मर्यादित नसून त्याचे परिणाम इतर अवयवांवरही होऊ शकतात.योग्य वेळी उपचार न घेतल्यास उच्च रक्तदाब,मधुमेह,स्थूलपणा,मणक्याचे आजारही उद्भवू शकतात,अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.हिवाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.जेणेकरून शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे,खनिज यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात मिळू शकतील,असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण व्यायाम करणे टाळतात.परंतु,या हंगामात व्यायाम करणे फायद्याचे आहे.नियमित व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ तर राहतेच शिवाय त्वचेतील पेशींची हालचाल व रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.त्यामुळे नियमित व्यायाम करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!