- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-‘शासकीय काम अन् काही दिवस थांब ‘ हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही विचार न करता जो झोडपणे सुरू होते; याची साधी कल्पनाही न केलेली बरी.असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तहसील कार्यालयात घडला.
चिमूर तहसील कार्यालयात कर्तव्यावर असलेले मासळ येथील मंडळ अधिकारी गोवर्धन मुन हे काल गुरुवारच्या दुपारी कार्यालयात शासकीय कामे करत बसले होते. दरम्यान,सुमेध मेश्राम नामक व्यक्ती मुन यांच्या केबिनमध्ये जात “माझा फोन कां उचलत नाही?माझा फेरफार कसा नामंजूर केला?मी कोण आहे तुला माहीत नाही काय?” असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली आणि कॉलर पकडली व मंडळ अधिकाऱ्याचे डोके धाडकन भिंतीवर जोरदार आपटले.मेलो रे बावा म्हणत ओरडायला सुरुवात करताच बाजूच्या रूममधील कर्मचारी धावून गेल्याने झोडपने बंद झाले.नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. सदरची घटना तहसील कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून दिवसभराचे काम केले.या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघटनेने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान तहसील कार्यालयात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
- Advertisement -

