- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका तरुणीचा विश्वास संपादन करून तिला कामाच्या बहाण्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या एका रिसॉर्टमध्ये नेले.रिसॉर्टमध्ये नेल्यानंतर पिण्यासाठी कॉफी बोलावली.मात्र,सदर तरुणीला देण्यात आलेल्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून पिण्यासाठी दिले व अत्याचार केला.अशातच आरोपींकडून सततचा छळ होत असल्याने त्रस्त होऊन पीडित तरुणीने याबाबत वडिलांनी माहिती दिली.त्यांनी लगेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून काल,मंगळवार ८ एप्रिलला तक्रार केली.तक्रारींच्या आधारावर तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता,२०२३ च्या कलम ६४,११५ (२),३५१ (४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तिघेही फरार असून,रामनगर पोलिस शोध घेत आहेत.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपी पीडितेला कामाच्या बहाण्याने घरून घेऊन गेला.दरम्यान,तिला ताडोबातील एका रिसॉर्टमध्ये नेले.यावेळी तिला दिलेल्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकले होते.ती कॉफी पिल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला.तसेच याबाबतची माहिती कुणाला दिली तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे पीडित तरुणीने याबाबत कुणालाही सांगतले नाही. परंतु,वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली.
- Advertisement -