Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस ठाण्यातील जप्त व बेवारस वाहनांचा लिलाव.. - लिलावात सहभागी होऊ...

देसाईगंज पोलीस ठाण्यातील जप्त व बेवारस वाहनांचा लिलाव.. – लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली तसेच अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत उभी असलेल्या वाहनांचा येत्या,शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी देसाईगंज येथे कायदेशीर लिलाव करण्यात येणार आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली २९ दुचाकी,८ चारचाकी वाहने, तसेच बेवारस स्थितीत आढळून आलेली ७७ दुचाकी आणि १५ चारचाकी वाहने अशी एकूण १२९ वाहने उभी आहेत.या सर्व वाहनांचा मूळ मालक शोधूनही न सापडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून कायदेशीर लिलावाची मागणी करण्यात आली होती.सदरच्या लिलावामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन देसाइगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!