Sunday, June 28, 2026
Homeगडचिरोलीकुरखेडा तालुक्याच्या देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत दीड कोटींचा घोटाळा...

कुरखेडा तालुक्याच्या देऊळगाव केंद्रावर धान आणि बारदाना खरेदीत दीड कोटींचा घोटाळा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात शासकीय धान खरेदी
केंद्रांवरून धान खरेदी केली जाते.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करण्यात येते.यानंतर  खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून त्याची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो.पण काही धान खरेदी संस्था पैश्याच्या हव्यासापोटी शासनास कोट्यवधी रुपयांचा चुना लावत असल्याचा प्रकार नुकताच कुरखेडा तालुक्याच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव केंद्रावर उघडकीस आला आहे.सदर प्रकार उघडकीस येताच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने धान घोटाळेबाजांना जबर हादरा बसला असून आणखी काही घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाच्या देऊळगाव खरेदी केंद्रावर भेट दिली असता,त्यांना २०२३-२४ हंगामात खरेदी करण्यात आलेले धान आणि बारदान्याविषयी संशय निर्माण झाला.त्यांनी चौकशी समितीमार्फत तपासणी केली असता कागदोपत्री  १९,८६० क्विंटल धानाची खरेदी दाखविण्यात आली होती.तर प्रत्यक्षात १५,९१६ क्विंटल धान आढळून आले.म्हणजेच ३,९४४ क्विंटल धानात तफावत आढळली.तसेच ४९,७५१ बारदान्यात १४,१४८ बारदान्याची तफावत आढळली.त्यांचा हिशोब केला तर जवळपास आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव खरेदी केंद्रावर १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यावहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सदर प्रकारामुळे कुरखेडाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्या अडचणीत वाढ झाली असून आणखी इतर खरेदी केंद्रावर अश्याच प्रकारे झांगडगुत्ता तर नाही ना..! याची पण चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.कुरखेडा पाठोपाठ आता देसाईगंज तालुक्यातीलही धान खरेदी केंद्रांची चौकशी करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!