Monday, January 19, 2026
Homeदेसाईगंज'कातवली गाय अन् काटे खाय' चा होणार भांडाफोड...३३ कोटी वृक्ष लागवड राज्य...

‘कातवली गाय अन् काटे खाय’ चा होणार भांडाफोड…३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजने अंतर्गत करण्यात आलेला भ्रष्टाचार येणार अंगलट…- उद्या पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर सत्यवान रामटेके बसणार आमरण उपोषणास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज सामाजिक वनिकरण विभागात ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजने अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या संपूर्ण कामांवरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत सत्यवान रामटेके यांनी २० एप्रिल २०२३ रोजी गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांना तक्रार दाखल करुनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा दिलेल्या तक्रारीवर अंमबजावणी करण्यात आली नसल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला असल्याची माहिती रामटेके यांनी दिली आहे.त्यानुसार उद्या दिनांक- २ मे २०२३ पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

रामटेके यांनी गडचिरोली विभागीय वन अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,शासन स्तरावरून १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना सुरू करण्यात आली.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनिकरण विभागा मार्फतीने देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी व कोरची या चारही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली.वृक्ष लागवडीसाठी सुरुवातीला खड्डे खोदकाम,विविध प्रजातींची रोपे खरेदी,रोपे वाहतूक करून मजुरांच्या मार्फतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली आहेत.लागवड करण्यात आलेल्या वृक्ष रोपांची तीन वर्षे प्रत्येक साईटवर मजुर नेमून रोपांना पाणी देणे,सभोवतालील कचरा सफाई करून निंदणी करणे,वृक्ष सभोवताल आरे तयार करणे व इतर कामे मजुरांच्या साहाय्याने करण्यात आली आहेत.

३३ कोटी वृक्ष लागवडीची कामे तर करण्यात आली.मात्र सदर केलेल्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी निदर्शनास दिसून येत आहे.वृक्ष लागवडीसाठी विविध प्रजातींची लाखो रुपयांची कागदोपत्री रोपे खरेदी करण्यात आली.मात्र खरेदी करण्यात आलेली रोपे कुठे गायब झाली.याचा थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.कित्तेक साईटवर काही वृक्षे सोडली तर केवळ करंज चीच वृक्षे दिसून येत आहेत.अशातच अंदाजपत्रकामध्ये रोपांच्या सभोवताल कुंपण करणे आवश्यक असता,कुंपण न करताच अनेक देयके काढण्यात आली.मोठ्या प्रमाणावर वृक्ष देखभालीसाठी मजुर कामावर लावून त्यांच्या नावे प्रमाणके तयार करून अनेकांच्या खात्यांवर रक्कम अदा करण्यात आली आहे.कित्तेक मजुर कामावर दाखविण्यात आली; मात्र देखभाल करण्यात आलेली वृक्षे कुठे गेली?याचा थांगपत्ता लागेना…! अशातच रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कित्तेक साईटवर जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना सुद्धा जिवंत रोपांची टक्केवारी जास्त दाखवून; वरिष्ठ कार्यालयाकडून निधीची मागणी करून; शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावल्या गेले आहे.एकाच विभागात असे असेल तर आणखी  विभागात किती?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून यामध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी,वन क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोळ करून शासनाच्या रकमेची अफरातफर केली आहे.कार्यालयातील वरिष्ठांच्या संमतीशिवाय कनिष्ठ कोणतेही पुढील पाऊल उचलूच शकत नसल्याने सर्वप्रथम ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांवर चौकशी करून येत्या सात दिवसांत कारवाई करण्यात यावी.येत्या सात दिवसांत चौकशी करून कारवाई न केल्यास देसाईगंज सामाजिक वनिकरण विभागाच्या कार्यालयासमोर  आमरण उपोषणास बसणार असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग हे देसाईगंज तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.’आम्ही पोमाडेंगी फेकत नाही; तर प्रत्यक्ष कृती करवून दाखवितो’ असेही रामटेके यांनी म्हटले आहे.जोपर्यंत ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण केलेल्या कामांवरील चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार नाही; तोपर्यंत आमरण उपोषणास बसणार असल्याचे रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!