- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-हल्ली अवैध रेतीचा उपसा करणाऱ्या तस्करांच्या मोठ्या गंमतीशीर तितक्याच मुजोरीच्या
घटना सर्वत्र उघडकीस येऊ लागल्या आहेत.नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथील रेती घाटावर महसूल पथकातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख रेती घाटावरून अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असतांना पोलिस पाटलासह काही पथक कारवाईला गेले असता वाटेतच काही रेती तस्करांनी कां यार..! तहसीलदारांना ‘एंट्री’ मिळते तरी आमचे ट्रॅक्टर कां पकडता? म्हणून हातात विटा घेऊन पथकाला धक्काबुक्की करून रेती तस्कर पसार झाले असल्याची घटना शनिवारी ५ एप्रिलच्या रात्री अडीच वाजता घडली.मात्र,याही घटनेची तक्रार पोलिसांत दाखल झाली की नाही? शंकाच उपस्थित केली जात आहे.त्यामुळे पाणी कुठेतरी पूर्णपणे मुरल्या गेले असल्याची चर्चा आहे.
भद्रावती तालुक्याच्या पिपरी घाटातून दहा ट्रॅक्टर अवैध रेती उपसा करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.त्यानुसार तलाठी अनिल गहूकर,तलाठी विनोद चिकटे,कोतवाल संदीप रामटेके,कोतवाल रंजिता डोंगे,पोलिस पाटील सुनीता ठोंबरे, रत्नाकर ठोंबरे हे रेतीघाटावर दाखल झाले.पथक पाहताच रेती घाटातून रेती तस्कर परस्पर इकडे-तिकडे पसार झाले.यातील एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला.पथकाने ट्रॅक्टरला घेराव घातला.काही मुजोर रेती तस्कर हातात विटा घेऊन उभे झाले व संधीचा फायदा घेत पसार झाले.दिवसेंदिवस रेती चोरांची हिंमत आणखीनच वाढत चालली आहे.काही अधिकारी खुर्चीवर बसूनच डेंगे हाकत असतात.मात्र, खालच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ही सत्य परिस्थिती आहे.
- Advertisement -