Tuesday, March 25, 2025
Homeचंद्रपूरकाँग्रेसचा हट्ट भाजपसाठी ठरला फायदेशीर.. - चंद्रपुरात पाच जागा भाजपकडे तर एक...
spot_img

काँग्रेसचा हट्ट भाजपसाठी ठरला फायदेशीर.. – चंद्रपुरात पाच जागा भाजपकडे तर एक जागा काँग्रेसकडे.. – कृष्णा सहारे यांनीही वडेट्टीवार यांना शेवटपर्यंत फोडला घाम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-लोकसभेत मिळालेले यश आपलेच आहे; त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; अशी टोकाची भूमिका काँग्रेसने चंद्रपुरात घेतली होती.काँग्रेसची ही भूमिका घटक पक्षातील स्थानिक नेत्यांना रुचली नव्हती.त्यात जवळच्यांना उमेदवारी देण्याचा अट्टाहास काही काँग्रेस नेत्यांनी धरला.त्यामुळे काहींनी बंडखोरी केली,लोकसभेत सक्रिय असलेले घटक पक्षातील प्रभावी नेते शांत बसलेत.याचा फटका सहा विधानसभा क्षेत्रात बसला आहे.महाविकास आघाडीला सहा पैकी केवळ ब्रम्हपुरी येथील एका जागेवर विजय मिळवता आला.लोकसभेप्रमाणे आघाडी टिकली असती तर सहा मतदार संघातील चित्र वेगळे असते,अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी एकजुटीने काम केले.त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.सहा मतदारसंघात मतांची आकडेवारी थक्क करणारी होती.मतांची आकडेवारी बघता काँग्रेस नेत्यांच्या मनावरील ताबा सुटला.मिळालेली मते काँग्रेसची आहेत,असा गोड समज त्यांनी केला.सहापैकी एकही जागा घटक पक्षाला सोडायला काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसच्या हा हट्ट भाजपसाठी फायदेशीर ठरला. अवघ्या सहा महिन्यापासून राजुरा मतदार संघात सक्रिय असलेले,पार्सल अशी टीका झालेले भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचा पराभव केला.
वरोरा विधानसभेत खासदार प्रतिभा धानोरकर याचा ‘ बंधूहट्ट ‘ काँग्रेसला नडला.काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले.दिवंगत माजी मंत्री संजय देवतळे यांना सत्तेतून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी बाहेर केले होते.देवतळे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार करण देवतळे यांचा येथे विजय झाला आहे.राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा विजय झाला खरा मात्र भाजपचे कृष्णा सहारे यांनी त्यांना शेवटपर्यंत घाम फोडला.
उमेदवारी मिळवण्यासाठी इथून तिथून भटकंती करणारे किशोर जोरगेवार शेवटी भाजपवासी झाले. त्यांचा भाजप प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोध होता.भाजपचे स्थानिक कार्यकर्ते विरोधात जातील अशी चर्चा होती.त्यातच भाजपचे खंदे कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली. मात्र,याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघात मोठ्या मताने विजयी झालेत.चिमूर मतदार संघात काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांनी टोकाची लढाई दिली.शेवटी भाजपचे बंटी भांगडिया यांनी येथे विजयाची हॅट्रिक साधली आहे.अपेक्षा नुसार बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला.काँग्रेसचा बंडखोर उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांचे बंड काँग्रेसचा पराभवला कारणीभूत ठरले आहे.गावतुरे यांना उमेदवारी मिळाली असती तर मुनगंटीवार यांना विजय मिळवणे जड गेले असते,अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नाराजीचा काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सुरक्षा दलांशी चकमक; तीन नक्षलींचा खात्मा..

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे.नुकतेच गुरुवार २० मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत...

कारागृहातील बंदींसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने आज,मंगळवार २५ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा...

अवैध रेतीची वाहतूक अंगलट; रेती भरलेला टिप्पर उलटून चालक ठार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करतांना भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटून चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया...

पैसे घेण्याचा नवा फंडा; कामे मंजूर करून पैश्यासाठी बायकोच्या खात्याचा वापर.. – गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकाऱ्याचा प्रताप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भरमसाठ पगार (वेतन)असूनही अनेकांचे वरच्या कमाई शिवाय पोटच भरत नाही; असे वाटते.याला काहीजण अपवादही आहेत.त्यातच सुरुवातीला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!