उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.आता नव्या करप्रणालीनुसार ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.तर स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.याशिवाय आता ९ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ ४५ हजार रुपयाचा तर १५ लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर १.५ लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “सरकारने करदात्यांच्या अनुपालनाचा बोजा कमी केला आहे.