उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील चोप येथे परमात्मा एक सेवक मंडळ यांच्या वतीने उद्या दिनांक – २१ एप्रिल रोजी परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत मानव जागृती,धर्म रक्षण,सामाजिक विकास, व्यसनमुक्ती आणि अंधश्रध्दा या पासुन मुक्त करुन गोरगरीब दुःखी-कष्टी गरीब मानवास मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महंत्यागी बाबा जुमदेव यांच्या कृपेने भगवत प्राप्तीचा परिचय करून देणारे व सर्व वाईट व्यसनातून मुक्त करुन सुखमय जिवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे प्रचार व प्रसार निमित्त सामुहिक हवन कार्य व सेवक सम्मेलन सोहळा पार पडणार आहे.
आज २० एप्रिल रोजी परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने गावामध्ये ग्रामस्वच्छता करण्यात आली. यावेळी राधेश्याम बरय्या,भाऊराव उईके,सुकरू केळझरकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.