Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज जैव विविधता उद्यान वनविभाग बाजूच्या परिसरात पसरले घाणीचे साम्राज्य- घुटके वनपालांनी...

देसाईगंज जैव विविधता उद्यान वनविभाग बाजूच्या परिसरात पसरले घाणीचे साम्राज्य- घुटके वनपालांनी पत्राद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- शहराला लागून आरमोरी मार्गे असलेल्या जैव विविधता उद्यान वनविभाग बाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून सदर घाणीतून उद्यानामध्ये व परिसरात सर्वत्र दुर्गंधी येऊ लागली आहे.दुर्गंधीमुळे जैव विविधता उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.अशातच दुर्गंधीच्या त्रासापायी जैव विविधता उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने यावर देसाईगंज नगरपरिषदेने त्वरित व वेळीच उपाययोजना करण्यात यावी; यासंदर्भात वडसाचे वनपाल आर.के.घुटके यांनी आज २० एप्रिल रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना पत्र सादर करून लक्ष वेधले आहे.

देसाईगंज येथील जैव विविधता उद्यानामध्ये चंद्रपूर,भंडारा,गोंदिया व इतर जिल्ह्यातील पर्यटक भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटीत असतात. त्याचप्रमाणे इतर माहिती संकलित करून महत्व जाणून घेतात.मात्र देसाईगंज नगर परिषदेचा शहरातील संपूर्ण कुडा-कचरा जमा करून जैव विविधता उद्यान परिसराच्या बाजूला आणून टाकला जात असल्याने कचरा व इतर टाकाऊ वस्तूंचे ढीग तयार होऊन त्यातून दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे अशी दुर्गंधी पसरू नये व उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये; याकरिता पर्यायी व्यवस्था करून तात्काळ कचऱ्याची विल्हेवाट लावावी.असे वनपाल आर.के.घुटके यांनी पत्ररुपी लक्षवेधी मागणी केली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!