Tuesday, July 28, 2026
Homeकुरखेडाउद्याला कुरखेडा येथे निःशुल्क "धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" नाट्य प्रयोगाचे आयोजन…..

उद्याला कुरखेडा येथे निःशुल्क “धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” नाट्य प्रयोगाचे आयोजन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :- झाडीपट्टी व नागरी रंगभूमीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेले चुडाराम बल्हारपूरे लिखीत व अनिरुद्ध वनकर दिग्दर्शीत “धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या तीन अंकी नाट्यची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन,मुंबई अंतर्गत सदर नाटकाचा प्रयोग मौजा कुरखेडा (जिल्हा-गडचिरोली) येथे उद्या दिनांक-३ नोव्हेंबर २०२३ ला “लोकजागृती संस्था,चंद्रपूर” संस्थेतर्फे सादर करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचे हस्ते होणार असून,प्रमुख उपस्थिती म्हणुन सुधीर मुनगंटीवार,मंत्री,वने व सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय,महाराष्ट्र राज्य,धर्मरावबाबा आत्राम मंत्री, अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र राज्य,अशोक नेते, खासदार चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र,कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र,डॉ.देवराव होळी, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र,पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.परशुराम खुणे उपस्थित राहणार आहेत.     

सर्वसामान्य जनतेसाठी हे नाटक शासनाचे वतीने विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.असे विकास खारगे प्रधान सचिव,सांस्कृतिक कार्य विभाग व विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय,मुंबई यांनी कळविले आहे.नाट्यप्रयोगात सिने.भारत रंगारी,प्रविण भसारकर, निखिल मानकर,अभिषेक मोहूर्ले,अरविंद खंदारे, प्रमोद दुर्गे,अखिल भसारकर,रविंद्र धकाते,जुगल गणवीर,रुपाली खोब्रागडे,राणी धुळे,स्मिता धुळे, जागृती निखारे,बाल कलावंत रुचीत निनावे इत्यादी कलावंतांसह एकूण ३५ कलावंत काम करीत आहेत.

गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा व बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध संघर्षासाठी दिलेल्या लढ्याची कथा आपल्याकडील जनमानसांना माहिती नाही.ती त्यांच्या पर्यंत पोहचावी, जसे विर उमाजी नाईक,वासुदेव बळवंत फडके,तंट्या भिल्ल यांचे चरित्र आपणांस माहीत आहे; तसेच गोंडवानातील आदिवासी क्रांतिकारकांची क्रांतीगाथा माहित व्हावी; हा या नाटकाच्या लेखनाचा व सादरीकरणाचा हेतू आहे. असे नाटकाचे दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर व नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!