Thursday, June 4, 2026
Homeचंद्रपूरविद्यूत तारेचा शॉक लागून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू…..

विद्यूत तारेचा शॉक लागून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शेतातील पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे; यासाठी शेतकऱ्याने कंपाऊडला विद्युत तारा जोडल्या होत्या.या विद्यूत तारेचा शॉक लागून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे आज दिनांक- २ नोव्हेंबर २०२३ सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. विष्णू विनोद कामडी वय १२ वर्षे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे रहिवासी असलेला विष्णू विनोद कामडी (वय १२) हा मुलगा जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकतो. तो गावातील मुलांना सोबत घेऊन मॉर्निंगवॉकसाठी जात होता.आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी विद्यालयाच्या खुल्या पंटागणात मुलांसोबत व्यायाम करीत होता.त्यांनतर तो पटागणाला लागून असलेल्या शेतात काही

कारणास्तव गेला असता त्याचा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तसाठी लावलेल्या तारेला स्पर्श झाला.त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.हा प्रकार त्याच्या सोबतच्या मुलांच्या लक्ष्यात येताच त्यांनी गावात जाऊन याची माहिती दिली.याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिप्ती मडकाम,पोलीस शिपाई मनोज तुरणकर,वाढई पोलीस शिपाई व विद्युत अभियंता रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उतरणीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!