Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व सेवा निवृत्त संस्थेच्या वतीने स्तुत्य...

देसाईगंज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व सेवा निवृत्त संस्थेच्या वतीने स्तुत्य उपक्रम…-सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- सर्व सेवा निवृत्त धारकांना शासन धोरणाप्रमाणे प्रतीवर्षी हयात प्रमाणपत्र सादरीकरण अनिवार्य असते.त्या अनुषंगाणे देसाईगंज परिसरातील स्टेट बैंक ऑफ इंडीया तथा सेवा निवृत्त कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संबंधीत सर्व पेंशन धारक व कुटुंब पेंशन धारकांना,रिझर्व बँक तथा जिल्हा कोषागार आकृती बंधा प्रमाणे पेंशन बँक खाते संदर्भात, आधारकार्ड पॅनकार्ड अद्यावत तथा लिंक प्रक्रीया,पिपीओ क्रमांक,नॉमीनी नोंद इत्यादी बाबी अद्यावत करणे व संबंधीत बुकलेटवर स्वाक्षरी करणे.या बाबत दिनांक-१ नोव्हेंबर २०२३ ला स्टेट बँक देसाईगंज(वडसा) येथे आयोजित मार्गदर्शन शिबीरात पेंशनधारकांना संबोधीत करण्यात आले.यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक राजू मुंडे व संघटना अध्यक्ष आर.एस.सोयाम तसेच आयोजक अनुराग बोरकर यांनी, विधीवत उद्‌घाटन करून बँकेच्या  विविध विविध बचत योजना तसेच कर्ज प्रकाराबाबत माहिती दिली.

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हयात प्रमाणपत्र दिनांक ०१/११/२०२३ ते ३०/११/२०२३ कालावधी पर्यंत सुरू राहणार असून,पुढे होणारा त्रास टाळण्याकरीता विहित मुदतीत फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले.स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज च्या वतीने करण्यात आले आहे.मोबाईल क्रमांक ची नोंद करणे,पेन्शन व इतर खात्यांना नामांकन करणे,आधार कार्ड अद्यावत करणे,आर बी आय च्या साईटवर आधारकार्ड लिंक करणे,पी पी ओ उपलब्ध नसल्यास ऑनलाईन प्रत मागवून देणे या मुद्यावर चर्चा करण्यात आली.अध्यक्ष सोयाम यांनी पेंशन धारकांच्या समस्या मांडल्या सदर प्रक्रीयेच्या यशश्वीते करीता संघटना प्रतिनिधीचे तात्पुरते दालन तयार करण्यात आले. याद्वारे पेंशन धारकांना सहकार्य लाभणार आहे हे विशेष.सदर प्रक्रीया एक महिना कालावधीत राहील या प्रसंगी संघटना सचिव बि.डी.सांगोडे, पी.पी.शिंदे,जयराम रासेकर,खान,विजय कावळे इत्यादी संघटना प्रतिनिधी तथा बॅकेचे सर्व कर्मचारीवृंद व परिसरातील सेवा निवृत्त पेंशन धारक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राधेश्याम पत्रे यांनी तर आभार प्रदर्शन रासेकर यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!