Wednesday, September 30, 2026
Homeआरमोरीइसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.मनोहर किसन नंदनवार वय ६५ वर्षे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून ते आरमोरी शहराच्या आदिवासी मुलांचे वसतिगृह नजिक वास्तव्यास होते.
मनोहर नंदनवार हे आज सकाळच्या सुमारास आरमोरी तहसील कार्यालय परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसून आले.प्रकरणी नागरिकांनी घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.नंदनवार यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिकचा तपास आरमोरी पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!