Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजआनंदावर पडले विरजण; 'आनंदाचा शिधा' मिळालाच नाही..!

आनंदावर पडले विरजण; ‘आनंदाचा शिधा’ मिळालाच नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राज्य शासनाने मोठ्या गाजावाजात गौरी-गणपती उत्सवानिमित्त राशन दुकानातून चार जिन्नस असलेला आनंदाचा शिधा गरीब पात्र लाभार्थींना देण्याची घोषणा केली होती.अशातच गौरी-गणपती उत्सव संपल्यानंतरही देसाईगंज तालुक्यात आनंदाचा शिधा मिळाला नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकार विविध सणानिमित्त पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो रवा,चणाडाळ,साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल,असा ‘आनंदाचा शिधा’ देत असते.यावेळी गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार अनेक पात्र लाभार्थी गृहिणींनी गोड पक्वान्न बनविण्याचे निश्चित केले होते.परंतु आनंदाचा शिधा वेळेवर उपलब्ध झालाच नसल्याने दिलेली घोषणा पूर्णपणे फोल ठरली आहे.अशातच आता पात्र लाभार्थी  ‘आनंदाचा शिधा’ मिळणार कधी? अशी आशा बाळगून आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!