- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे सर्व राहणार साटगाव कोलारी,ता.चिमूर, जि.चंद्रपूर अशी तलावात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.यातील दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ व एका मित्राचा समावेश आहे.१६ वर्षीय आर्यन हेमराज हिंगोली थोडक्यात बचावला.
घोडाझरी या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते.शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात.आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे व आर्यन हेमराज हिंगोली ही सहा मुले पर्यटनासाठी गेली होती.दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली.पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले.अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे हे पाचही जण बुडाले तर आर्यन हेमराज हिंगोली पाण्यातून बाहेर आला.तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने ही घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली.त्यानंतर अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पाचही मुले तलावातच बुडालेली होती.अशातच शोध मोहीम राबविल्या नंतर पाचही जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आली आहे.
- Advertisement -