मुंबई :-स्वस्त धान्य दुकानातून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. पूर्वी अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डामागे १० किलो गहू व २५ किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत होते.अशातच शासनाने यात बदल करीत सध्या स्थितीत अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डामागे १६ किलो गहू व १९ किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे.त्यातच राज्य शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते.शासनाने लाभार्थ्यांना तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे.सदर बदल मार्च २०२५ पासून लागू होणार असून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे.लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली आहे.त्याबदल्यात लाभार्थ्यांना आता तांदुळ जास्त मिळेल.
आता रेशन दुकानातून गव्हाचे प्रमाण होणार कमी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

