Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

येत्या २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वसंत भा.कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली च्यावतीने येत्या २२ मार्च रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली,अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४० वर्षापासुन न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.यासाठी पक्षकार,अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे,१३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे,भु-संपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे,नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे.लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते.लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ,श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा,चांगले संबंध निर्माण होतात.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजीत केले आहे.लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपले वाद सामोपचाराने मिटवावीत,असे आवाहन वसंत भा.कुलकर्णी,अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली तसेच आर.आर.पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी कले आहे.  सर्वांनी येत्या २२ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा; असे आवाहन अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला सिंदेवाहीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन.. – महसुली तक्रारींचा तातडीने होणार निपटारा; नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसुली विषयक तक्रारींचे तातडीने...

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, बुधवार २२ जुलै रोजी ५६ वा वाढदिवस संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार...

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!