Wednesday, September 23, 2026
Homeदेसाईगंजआता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये अनियमितता केल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करण्यात आलेले असतांनाच आता देसाईगंज तालुक्याच्या काही ग्रामपंचातींमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचे प्रकार लवकरच सार्वजनिक होण्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू झाली आहे.विशेष म्हणजे,याविषयी हवेत गोळीबार नाही; तर प्रत्यक्ष पुरावे अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवण्यात येणार असल्याने संबंधितांना सरळ घरचा रस्ता दाखविला जाणार आहे.
कुठलेही काम असो,सर्वच नियमांना अनुसरून करण्यात येतात असे नाही.कामांमध्ये उन्नीस-बिसचा फरक असतोच.पण,जनतेच्या सोयी-सुविधांसाठी आलेल्या निधीवर काम न करताच डल्ला मारल्या जात असेल तर.?अशा लोकांना काय म्हणावे.त्यातच,सुशिक्षित असणारेही त्यात सहभागी होऊन खिसे गरम करण्यात माहीर होत असतील तर जनता-जनार्दन अश्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.कमी रकमेची सहित्ये खरेदी करून जास्त रकमेचे देयक(बिल)काढणे,एकच साहित्य वारंवार खरेदी करणे,जवळीक दुकानदाराच्या नावानेच खरेदी दाखवणे,निविदा तसेच दरपत्रक न मागवता लाखो रुपयांची देयके एकाच दुकानदारास देणे,कामाचे नाव दुसरे व देयके तिसऱ्याच दुकानदाराला देणे,एकाच घटकामध्ये लाखो रुपयांची देयके व इतर अश्या नाना तऱ्हेच्या अत्यंत गंभीर बाबी देसाईगंज तालुक्याच्या काही ग्रामपंचातींमध्ये उघड होऊ लागल्या आहेत.भोळ्या-भाबड्या जनतेची कामे न करता लाखो रुपयांच्या निधीवर हात सफाईचे काम काही जणांनी केल्याचे दिसून येत असल्याने अश्यांचे पितळ लवकरच सार्वजनिक होऊन उघडे पडणार असल्याचे सुजाण नागरिकांनी सांगितले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!