Friday, June 19, 2026
Homeमुंबईआता ग्रामपंचायत हद्दीत बॅनर-होर्डिंग लावण्याबाबतचे धोरण; ग्रामपंचायतींना मिळणार उत्पन्न..

आता ग्रामपंचायत हद्दीत बॅनर-होर्डिंग लावण्याबाबतचे धोरण; ग्रामपंचायतींना मिळणार उत्पन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-शहरी भागासह ग्रामीण भागात सण-उत्सव, राजकीय,बारसा तसेच विविध कार्यक्रमांचे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर बॅनर-होर्डिंग लावण्यात येतात.शहरी भागात बॅनर लावण्यासंबंधी नियम-धोरणे आहेत.मात्र,ग्रामपंचायत पातळीवर असे नियम नाहीत.मुळात आपल्या हद्दीत बॅनर लावण्याची परवानगी देण्याची तरतूदच ग्रामपंचायत अधिनियम किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी अधिनियमात नाही.मात्र,राज्य सरकार आता ग्रामपंचायत हद्दीत बॅनर-होर्डिंग लावण्याबाबतचे धोरण ठरविणार आहे. त्यासाठी एक तज्ज्ञ समितीही स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासनादेश काढला आहे.यामुळे ग्रामपंचायत स्तरावर बॅनरबाजीवर नियंत्रण तर येणारच आहे,परंतु ग्रामपंचायतींना महसूलवाढीसाठी चांगला पर्यायही उपलब्ध होणार आहे.ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत विचार करण्यात आला होता.ग्रामपंचायतीला बॅनर लावण्याची परवानगी देण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे.पंचायती राजचे संचालक समितीचे अध्यक्ष असतील.इतर राज्यांतील धोरणांचा अभ्यास समिती करील.परवानगी देण्याची कार्यपद्धती ही समिती ठरवेल.नगरविकास,बांधकाम आदी विभागांचे यासंबंधीचे नियम-मार्गदर्शक तत्वे यांचाही ही समिती अभ्यास करील.ग्रामपंचायतींना प्राप्त होणारा महसूल व त्याच्या विनिमयाचे धोरण समिती ठरविणार आहे.मुंबईत होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. पुणे तसेच इतर शहरांतही अशा प्रकारच्या दुर्घटना घडून मनुष्यहानी झालेली आहे.त्यामुळे ही समिती होर्डिंग बॅनरमुळे दुर्घटना झाल्यास जाहिरात संस्थांची जबाबदारी,विमा आदींचाही धोरणात समावेश करणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!