Monday, August 3, 2026
Homeबीडपोलिसांची प्रतिमा डागाळल्याने दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ.. - एकजण एसपीच्या निवासस्थानीच ओढत...

पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ.. – एकजण एसपीच्या निवासस्थानीच ओढत होता गांजा तर दुसऱ्याने वाळू माफियांना केली मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात बीड जिल्हा चर्चेत आला होता.त्यानुसार जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उचल बांगड्या करून मोठे फेरबदल करण्यात आले.पोलिस प्रशासनावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत काँवत यांची वर्णी लागली.अशातच आता बीड पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सदरची कारवाई थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या आणि वाळू माफियांना मदत केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या म्हणजेच एसपींच्या घरात बसून गांजा ओढतांना आढळून आला होता.याच अनुषंगाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.तर रामप्रसाद शिवनाथ कडूळे या पोलीस कर्मचाऱ्याने वाळू माफीयांना मदत केली होती.याच अनुषंगाने या पोलीस कर्मचाऱ्याला अटक देखील झाली होती.दोन्ही प्रकरणात पोलिसांची प्रतिमा डागाळल्याने त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या दोघांचे निलंबन करत सेवेतून बडतर्फ केले आहे.यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निवासस्थानी डागडुजीचे काम सुरू आहे.सध्या ते गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत.यादरम्यान,ते रात्रीच्या वेळी घराची पाहणी करण्यासाठी कुटुंबियांसोबत पोहोचले होते.पोलीस कर्मचारी बाळू बहिरवळ हा दरवाजा लावून गांजा पित आतमध्ये बसला होता आणि तो दार उघडत नव्हता.स्वत: पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दरवाजा उघडण्याचा बराच प्रयत्न केला,पण बाळू बहिरवळ हा दरवाजा उघडत नव्हता.त्यानंतर नवनीत काँवत यांनी रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले.त्यानुसार बाळू  बहिरवाळ याने गांजा ओढल्याचे निष्पन्न झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

तलावात बुडालेल्या तरुणाचा आज सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या धानोरी गावातील २२ वर्षीय तरुण काल रविवारच्या सायंकाळी गाव तलाव परिसरात आंघोळ करण्यासाठी उतरला असता क्षणात दिसेनासा झाल्याने परिसरात एकच...

गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी जाधव यांची बदली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथे बदली करण्यात आली असून आज,सोमवार ३ ऑगस्ट रोजी त्यांना गडचिरोली...

सावधान..! तुमच्याही बँक खात्याचा होऊ शकतो सायबर फसवणुकीसाठी गैरवापर.. – नागरिकांनी आपले बैंक खाते,एटीएम कार्ड,पासबुक कुणालाही वापरण्यासाठी देऊ नये.. – आपले बँक खाते...

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारीचा नवीनच गंभीर प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनेक बँक खातेधारक अडकल्याचे स्पष्ट झाले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!