Saturday, August 8, 2026
Homeगोंदियामनात नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो..! -...

मनात नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो..! – आई-वडिलांनी प्रोत्साहन देऊनही नाही ऐकला आणि गळफास घेतला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जीवनात हार-जीत व चढ-उतार येतच राहतात.कधी सुख तर कधी दुःख हे जीवन चक्र आहे; मनुष्याला एकदाच अनमोल असे जीवन मिळत असते. मिळालेल्या जीवनाचे सोने करणे हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे.आपण एकदा हरलो म्हणजे संपूर्ण आयुष्य हरलो,असे होत नाही.तर त्याचा सामना करून पुढील आयुष्य जगून विजय मिळवला पाहिजे.अशातच एका बारावीची परीक्षा दिलेल्या व बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या आपल्या मुलाला मनात नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो..! असे आई-वडिलांनी प्रोत्साहन देऊनही त्याने आई-वडिलांचे न ऐकता नैराश्यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविल्याची घटना काल,बुधवारी ७ मे रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली.क्रिष्णा धर्मराज शिवणकर याने घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.विशेष म्हणजे,कालच त्याचा वाढदिवस होता.त्यामुळे घरचे कुटुंबीय आनंदात होते.क्रिष्णा शिवणकर याने यावर्षी आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती.बारावी परीक्षेचा निकाल सोमवार ५ मे रोजी जाहीर झाला. अशातच क्रिष्णा हा परीक्षेत नापास झाला.सगळे सोबती पास झाले,मात्र मीच नापास झालो.त्यामुळे तो नैराश्यात गेला होता.त्यामुळे तो गेल्या दोन दिवसांपासून कुणाशीही धड बोलत नव्हता व त्याच्या वर्तणुकीत बदल झाला होता.अशातच क्रिष्णाने काल बुधवारी नापास झाल्याचा टेन्शन घेऊन घरी कुणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात होऊन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!