Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजआता खरच सांगा…साहेब/मॅडम तुम्ही… कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा रेती घाटात लक्ष घालणार काय?-किती...

आता खरच सांगा…साहेब/मॅडम तुम्ही… कोंढाळा पिंपळगाव वैनगंगा रेती घाटात लक्ष घालणार काय?-किती ह्या रेतीच्या चोऱ्या…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- करोडो रुपयांच्या महसूल प्रशासन विभागास चुना लावण्यात रेती चोर माहिर झाले असून ‘खळखळ नभात करतेय’ म्हणण्यापेक्षा ‘खळखळ गावात करतेय’ साहेब/मॅडम असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कोंढाळा गावातील पत्रकार सत्यवान रामटेके यांच्या घरा समोरील मुख्य रस्त्यावरून तसेच गावातील पलिकडील बायपास मुख्य मार्गावरून रात्रौ ११ वाजे तसेच २ वाजेच्या सुमारास तर पहाटे ४ वाजे पासून अवैध रेतीचा जो बोलबाला सुरू होतो; तो थांबता- थांबेनासा झाला आहे.यामध्ये कमी वयांच्या मुलांना ३०० रुपये ब्रास एक ट्रॅक्टर ट्रॉली रेती ठरवून त्यांचा गैर फायदा घेतला जातो आहे.रात्रभर कितीतरी ब्रास अवैध रेतीचा उपसा रेती चोरटे करीत आहेत व महसूल प्रशासन विभागाच्या तसेच पोलीस प्रशासन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गांवर २०० ते ३०० रुपये रोजीची मुले वा युवक पाळत ठेवून कोण? कुठे चाललाय? व कुठे जाणार? याची परिपूर्ण तसेच संपूर्ण माहिती एका फोनवर तसेच व्हॉटसअप वर घेतांना दिसून येत आहेत.अनेकांना सर्वांच्या वाहनांचे नंबर मुकपाठ झालेले असल्याची गुपित माहिती मिळाली आहे.त्यानुसार रेती चोरटे ‘आला रे बावाजी’ म्हणून माहिती पुरविण्यात मग्न झाले आहेत.त्यामुळेच अनेकांच्या हातावर तुरी देऊन तसेच अवैध रेती चोरी करून नवनवीन ट्रॅक्टर तसेच इतर साधने अनेकांनी खरेदी केली असल्याची गुपित माहिती मिळाली आहे. अशातच अनेकजण मुंग गिळून चुप्पी साधून ‘पैका करे तैका’ असे अनेकजण समजू लागले असल्याने अशांवर तसेच रेती चोरट्यांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न पडला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!