उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात झाडाची कत्तल केली.हिरव्यागार जंगलाला भकास केले.वन संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनविभागाकडून हे कृत्य झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी आक्षेप घेतला होता.
त्यानंतर वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते.वनरक्षकाला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला.मात्र माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर वनविभागाला उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे.अखेर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ त्या’ वनरक्षकाला दोषी धरुन चौकशी अंती निलंबित केले आहे. त्याचे नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वनरक्षकाला निलंबित करण्यात आल्यामुळे वन विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.