Tuesday, September 22, 2026
Homeबीडअवैध वाळू उपसा करणाऱ्यांची बाजू घेणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पडले महागात.. -...

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची बाजू घेणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पडले महागात.. – पोलीस अधिक्षकांनी दोघांनाही केले निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिल्ह्याच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असतांनाच अवैध वाळू उपसा व खंडणीचे प्रकरण चांगलेच रंगू लागले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांची तात्काळ बदली करण्यात आली असून नवे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांना नियुक्त देण्यात आली आहे. कावंत यांनी रुजू होताच कामात हयगय करणाऱ्यांची खैर नसल्याचे स्पष्ट केले असतांनाच बीड जिल्ह्याच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू उपसा प्रकरणात अरोपिंशी हातमिळवणी करून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई केली नसल्याने बीडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे.त्यातच बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांनी अवैध वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले.सदर दोन्ही पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरांवर वाळूसह कारवाईचे आदेश असतांना पोलीस कर्मचाऱ्यांनी खाली ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले.तसेच कारवाई करण्यास विलंब लावला.त्यामुळे वाळू माफियांशी हितसंबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याने पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.प्रकरणी पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!