Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीआता अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यांची खैर नाही.. - गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत...

आता अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यांची खैर नाही.. – गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे स्थायी चेकपोस्ट आणि कडक कारवाईचे आदेश.. -अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थायी चेकपोस्ट आणि कडक उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश आदेशान्वये आज,शुक्रवार ३१ जानेवारीला यंत्रणेला दिले आहेत.यानुसार जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागांमध्ये स्थायी चेकपोस्ट (FRB कॅबीन)स्थापन करून ते त्वरित कार्यान्वित करण्याचे आणि या चेकपोस्टवर मंडळ अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी आणि नायब तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चेकपोस्टवर दररोज २४ तास  (२४x७) कर्मचारी आणि पोलिस तैनात करण्याचे आदेश असून,महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र आदेश काढावेत व प्रत्येक वाहनाची ईटीपी ETP (Electronic Transit Pass) तपासणी करून त्याची वैधता निश्चित करण्याचेही निर्देश दिले आहेत.
गौण खनिज वाहतूक तपासणी आणि कारवाई👇
अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांनी प्रत्येक वाहनाची ईटिपी (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) तपासून ती वैध आहे का, याची खात्री करावी.नियमबाह्य उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास,वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत.
या मोहिमेअंतर्गत महसूल,पोलिस आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक गठीत करून अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा,तसेच त्यासंबंधीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात गुगल शिटवर अद्ययावत करायचे आहेत.
चेकपोस्टवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियमावली👇
सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कोणीही विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
तसेच वाहन चालक किंवा मालकाकडून गैरवर्तन आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम २२१ अंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कारवाईसाठी जप्त केलेली वाहने संबंधित तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्यात पुढील आदेशापर्यंत ताब्यात ठेवण्याचे निर्देश आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संयुक्त पथकाने आपसी सहकार्याने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक पूर्णतः रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने यासंदर्भात कठोर कारवाई करून अवैध उत्खननाला आळा घालावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!