उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली):- देसाईगंज तालुक्यातील शासनाच्या अवैध उत्खनन चोरी करणाऱ्यांची ‘ऑन दि स्पॉट’ रात्री-बेरात्री अवैध उत्खनन करणाऱ्यांची वाहने पकडुन ‘मी एक वाहन पकडतो व दुसरा वाहन सोडतो’; मात्र विदर्भ की दहाड चे प्रतिनिधी यांना तुम्ही सांभाळा..!अन्यथा ते आमची वाट लावणार..! म्हणून अनेक प्रतिनिधींची जाणून-बुजून नावे समोर करून बदनामी करण्याचा हल्ली प्रकार देसाईगंज तालुक्यात उघडकीस येऊ लागला आहे.अशातच शासनाच्या अवैध गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांना दुजोरा देऊन विदर्भ की दहाड प्रतिनिधीं बाबत वैरत्व पसरविणारे देसाईगंज विभागाच्या एका कार्यालयातील ‘ते’ अधिकारी व कर्मचारी कोण?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.’विदर्भ की दहाड’ वृत्तपत्रातील प्रतिनिधींचे सदर प्रकरणांत ‘ना सुतक ना बारसा’असतांना असे मुजोर अधिकारी व कर्मचारी कां बरं पोमाडेंगी फेकतात? हेच कळेनासे झाले आहे. स्वतःच चोरांचे साथीदार अन् चोरांच्या उलट्या बोंबा असे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.
हल्ली अवैध उत्खनन करून चोरी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.अशातच काही जणांना गुपितरित्या अवैध रेती,मुरूम व इतर गौण खनिजांची सूत्रांकडून माहिती दिली जाते.त्यानुसार काही चोरांचे साथीदार घटनास्थळ गाठून खिसे गरम करतांना आढळून येतात.त्यामुळे विदर्भ की दहाडचे प्रतिनिधी सदर घटनेची सत्यता पडताळून रोखठोक वृत्त प्रकाशित करीत असतात.मात्र एका संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी विदर्भ की दहाडच्या प्रतिनिधींची नावे समोर करून तस्करांना खोटे-नाटे सांगून वैरत्व पसरवीत आहेत.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून ‘त्या’ अधिकारी व कर्मचऱ्यांना असे प्रकरण एक दिवस अंगलट येणार आहे.