- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला फुस लावून पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणास लाखांदूर पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे.मनिष भारत बोदेले वय २२ वर्षे,रा.भागडी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याला आज,शुक्रवार ५ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मागील मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या आईने लाखांदूर पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती.याप्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक-२७२/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलम १३७(२)अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.दरम्यान,तांत्रिक तपासाच्या आधारे पीडितेसह आरोपीचा शोध सुरू असतांनाच संशयित आरोपी मनिष बोदेले हा मुलीला घेऊन नागपूर शहरातील कळमना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.लाखांदूर पोलिसांनी तातडीने नागपूर गाठले व आरोपी आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन लाखांदूर येथे आणले.येथे आणल्यानंतर अल्पवयीन मुलीची लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे या प्रकरणात पीडितेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या गुन्ह्यात कलम ६४,२(आय)बीएनएस तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम चार व सहाची वाढ केली.
आरोपीला न्यायालयात हजार केले असता आरोपी मनिष बोदेले याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- Advertisement -

