- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-कठोरात-कठोर कायदे असले तरीही
अल्पवयीनांवर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.नुकतेच शुक्रवार २५ जुलै रोजी सामान्य नागरिकांच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत होत चालले आहे; असे महत्वपूर्ण निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नोंदवले होते. तब्बल ५५ गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आरोपीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असता त्याच्या अर्जावर सुनावणी करतांना खंडपीठाने महत्वपूर्ण टिप्पणी केली होती.गुंडांबद्दल कोणतीही सहानुभूती बाळगता कामा नये.त्यांच्याविरोधातील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी अधिक जलदगती न्यायालये स्थापन केली पाहिजेत.असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला चक्क ५५ वर्षीय इसमाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.आरोपीवर भारतीय न्याय संहिता ६४ (१),६४ (२),(एम) सहकलकम ४,६ पोक्सो, ॲट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करून अटक केली व मुख्य लोकअभिरक्षक ॲड.विनोद बोरसे यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली.आरोपी नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील खरबी गावातील रहिवासी असून रितेश राजू बाग वय ५५ वर्षे,असे त्याचे नाव आहे.आरोपी हा घर बांधकाम करण्याचे काम करतो.त्यामुळे तो घर बांधकामाच्या अनुषंगाने मूल तालुक्यातील एका गावात गेला होता.बांधकाम करीत असतांना त्याच गावातील घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व विविध आमिष दाखविले.
मागील आठवड्यात मुलीला घेऊन दुसऱ्या गावी गेला होता.त्या ठिकाणी त्याने मुलीवर अत्याचार केला. आरोपीने अल्पवयीन मुलीला स्वतःकडे दोन ते तीन दिवस ठेवल्यानंतर तिला मूल येथे सोडून दिले. दरम्यान, अल्पवयीन मुलीने पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली.त्यानुसार मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी तात्काळ दखल घेत आरोपीस बेड्या ठोकल्या.
- Advertisement -

