उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील २० वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी आरोपी तरुणास पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची घटना तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी २४ ऑक्टोंबर घडली.सदरची घटना आज,रविवारी दिनांक-२७ ऑक्टोंबरला उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विनोद घनश्याम पात्रीकर वय २० वर्षे रा.इंजेवारी ता.आरमोरी असे आरोपीचे नाव आहे.अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिडीतेची आई ही २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी बाहेरून काम करुन घरी परतल्या.घरी परतल्याने पिडीता मुलगी घरी आढळून आली नाही.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता न लागल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या लोकेशन बाबत शोध घेतला असता मुलगी आढळून आली.मात्र,मुलीच्या आईने मुलगी मिळाल्यास कुठलीही तक्रार करणार नसल्याचे लेखी लिहून देत मुलीला घरी घेऊन गेली.दिनांक-२३ ऑक्टोंबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्याने पिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले.पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता,पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.त्यानुसार पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाणे गाठून तोंडी रिपोर्ट दाखल केली. तक्रारीनुसारआरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१),३७६ (२) (नं, भां.द.वी.सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करीत २४ ऑक्टोबरला आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

