Saturday, August 1, 2026
Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलीस पाटलास अटक..

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलीस पाटलास अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सिंदेवाही तालुक्यातील देवाडा येथील पोलिस पाटलाने एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली.अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलासह पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली असून, यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.मुकेश काशीनाथ पेटकुले वय २८ वर्षे रा.देवाडा,ता.सिंदेवाही असे आरोपी पोलिस पाटलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी ५ जानेवारीला अल्पवयीन मुलगी शाळेचा कार्यक्रम असल्याने गावातील तीची वर्ग मैत्रीण मिळून सकाळी कार्यक्रमाला हजर झाले होते.दुपारी ३ वाजताच्या दरम्यान शाळेचा कार्यक्रम संपन्न झाल्याने दोघेही सिंदेवाही येथून बसने देवाडाकरिता निघाले.देवाडा गावच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर काही वेळात मुलींना गावातील पोलिस पाटिल मुकेश पेटकुले आपल्या दुचाकीने आल्याचे दिसले.बस स्थानकापासुन गाव काही अंतरावर असल्याने मुलींनी पोलिस पाटील पेटकुले यांच्यावर विश्वास ठेऊन गावात सोडून द्यावे; अशी विनंती केली.पेटकुले यांनी सोडून देतो म्हणून दोन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवले.फिर्यादी मुलीला सिंदेवाहीला घेवून जातो आणि तिच्या वर्ग मैत्रीणींना बसस्थानकावर ठेवतो बोलू लागल्याने फिर्यादी मुलीने येण्यास नकार दिला.तरीसुद्धा आरोपी पेटकुले आग्रह करीत होता.काही अंतरावर दोन्ही मुलींनी पेटकुले यांना दुचाकी थांबविण्यास सांगितले आणि दोन्ही मुली दुचाकीवरुन उतरून पायी-पायी गावाच्या दिशेने निघाल्या.आरोपीने आपली दुचाकी पुन्हा मुलींजवळ आणून मुलींना दुचाकीवर बसविले आणि दुचाकी सिंदेवाहीच्या दिशेने फिरविली.त्यावर फिर्यादी मुलीने चालत्या दुचाकीवर प्रतिकार करुन आपल्या वडीलांना फोन करून देवाडाच्या बसस्थानकावर येण्यास सांगितले.त्यावर आरोपीने घरी फोन नको करू असे बोलला आणि मोबाइल आपल्याजवळ ठेवून घेतला. त्यानंतर फिर्यादी मुलीची ओढनी ओळून केस पकडले, व घरी कोणाला फोन नको करू तुझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे,ते तुझ्यावर विश्वास करणार नाही,असे म्हणून वर्ग मैत्रीनी समोर फिर्यादी मुलीसोबत बळजबरी करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करू लागला.तितक्यात फिर्यादी मुलीचे वडील त्याठिकाणी आले आणि घडलेला सर्व प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला.यावरून अल्पवयीन मुलगी,तिचे वडील व वर्ग मैत्रीण मिळून सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिस पाटिल मुकेश पेटकुले याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच सिंदेवाही पोलिसांनी आरोपी मुकेश काशिनाथ पेटकुले याला अटक करुन ताब्यात घेतले. पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे आणि सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राधिका गायकवाड करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!