Wednesday, June 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे आवश्यकच; अन्यथा कारवाई...

आता वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे आवश्यकच; अन्यथा कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक असून,सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिलेले आहेत.याअन्वये राज्यातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता सुचना जारी करण्यात आल्या आहेत.१ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ च्या नियम ५० नुसार वाहनास हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता वेगवेगळ्या एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहेत.त्यासाठी काही जिल्ह्यात पोर्टलही निश्चित करण्यात आलेले आहे.वाहनधारकांनी पोर्टल बुकिंग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्यावे लागणार आहे.वाहनधारक त्या जिल्ह्याच्या कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त संबंधित जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरीता दुचाकी,ट्रॅक्टर करीता ४५० रुपये, तीन चाकी वाहनाकरीता ५०० रुपये आणि इतर सर्व वाहने ७४५ रुपये आकारण्यात येणार आहे.
वाहनधारकांना त्याच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास, संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तक्रार दाखल करू शकतात.वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण,पत्ता बदल, वित्त योजना चढविणे,उतरविणे,दुय्यमप्रत,विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने, आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!