Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाव्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार - विद्या...

व्यावहारीक ज्ञानासाठी बाल आनंद मेळावा महत्वपुर्ण-सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार – विद्या निकेतन शाळा कोंढाळा येथे बाल आनंद मेळावा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-शिक्षणासोबतच मुलांना व्यावहारीक ज्ञानाची देखिल गरज आहे.दर्जेदार शिक्षणांसोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे.विद्यार्थ्यांनी भरवलेला हा आनंद मेळावा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार यांनी केले.देसाईगंज तालुक्याच्या विद्या निकेतन लोकमान्य टिळक विद्यालय कोंढाळा येथे नुकताच बाल आनंद मेळावा संपन्न झाला.प्रसंगी आयोजित मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार बोलत होते.
बाल आनंद मेळावा हा शैक्षणिक जिवणपटलावरील महत्वाचा घटक आहे.विद्यालयीन शिक्षण घेत असतांना व्यवसायाची सांगड घालून ज्ञानार्जन गिरविले पाहिजे. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षणासह इतरही पाया मजबूत करणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे विद्यालयाने आयोजित केलेला बाल आनंद मेळावा कौतुकास्पद आहे.तसेच आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळत आहे.विद्यार्थिनींनी व्यवसायाची मांडणी, हिशोब,संवादकौशल्य यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचेही प्रतिपादन कुंभलवार यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयानंद बुराडे,शाळेचे मुख्याध्यापक केशव देशमुख,पत्रकार
नितेश पाटील,शिक्षक हर्षे,शिक्षिका रीना कन्नाके, स्वाती ढोंगे,हर्षद कांबळी,मनोज तरवटकर,अशोक निंबुरकर,दिलीप पारधी,आशिष बुल्ले सह शिक्षक- पालक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!