Friday, May 1, 2026
Homeभंडाराअपघातात तरणेबांड मुलाचा मृत्यू..!

अपघातात तरणेबांड मुलाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अपघात वा एखाद्याचा मृत्यू हा क्षणिक आहे. कोण,केव्हा सोडून जाईल,याचा नेम नाही.ईश्वराची किमया ही अलगच आहे; तो आपल्यावर कधीही येऊच देत नाही.कारण एखाद्याच्या मृत्युसाठी कुठले ना कुठले तरी कारण असतेच,त्यामुळे तू इतका निर्दयी कां?असे म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही.त्यातच,एखाद्या तरणेबांड मुलाचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांची अवस्था कशी होत असते,हे ईश्वरालाच माहीत.अशीच काळीज धडधडायला लावणारी घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील धारगाव गावाजवळील मुख्य मार्गावर काल मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.मुख्य मार्गावर ना वळण ना समोरून येणारे कोणते वाहन, तरीही रस्त्याच्या एका बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला मागून स्कूटीची जोरदार धडक झाल्याने स्कूटीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला.संकेत सुखदेव सपाटे वय ३० वर्षे,हनुमान नगर,लाखनी,जि.भंडारा असे मृत तरूणाचे नाव असून तो भंडारा येथून त्याच्या गावी लाखनीला जात असतांनाच सदरचा अपघात घडला. एमएच ३६ एएम ४५०६ क्रमांकाच्या स्कूटीने संकेत हा भंडाराहून लाखनीला जाण्यासाठी निघाला असता भंडारा तालुक्याच्या धारगावजवळ जाताच तेथील मार्गावर रस्त्याच्या बाजूला सीजी ०४ एमबी ७६९६ क्रमांकाचा एक ट्रक उभा होता.ट्रक उभा असतांनाच संकेतने ट्रकच्या मागील बाजूस स्कूटी नेऊन आदळली. यात स्कूटीच्या नुकसानीसह डोक्याला जबर मार लागल्याने संकेतला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!