Sunday, August 9, 2026
Homeनागपूरआज संत्रा नगरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-ट्वेंटीचा थरार..

आज संत्रा नगरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-ट्वेंटीचा थरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याची उपराजधानी तथा संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरात आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-ट्वेंटीचा थरार रंगणार आहे.सदरचा सामना हा नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला जाणार आहे.विशेष म्हणजे,भारतीय क्रिकेट संघ हा न्यूझीलंडशी पाच सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना आज बुधवारी होणार आहे. त्यानंतर,२३ जानेवारी,२५ जानेवारी,२८ जानेवारी व ३१ जानेवारी २०२६ रोजी सामने खेळले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे,येत्या,७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे.आज नागपुरात होणाऱ्या सामन्यासाठी सुमारे ४० हजाराहून अधिक क्रिकेट प्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता नागपूर पोलिसांनी व्यक्त केली आहे.त्यानुसार,वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळे पार्किंग,फिडर बसेसची पूर्वतयारी केली असून अधिकाधिक मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
  • असा असेल संघ👇
भारत : सूर्यकुमार यादव(कर्णधार),अभिषेक शर्मा, संजू सैमसन(विकेटकीपर),श्रेयस अय्यर(पहिले तीन टी-२०),हार्दिक पंड्या,शिवम दुबे,अक्षर पटेल (उपकर्णधार),रिंकू सिंह,जसप्रित बुमराह,हर्षित राणा, अर्शदीप सिंग,कुलदीप यादव,वरुण चक्रवर्ती,ईशान किशन(विकेटकीपर),रवि बिश्नोई.
न्यूजीलंड : मिशेल सेंटनर(कर्णधार),माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन,डेवोन कॉनवे,जैकब डफी,जैक फाउल्क्स,मैट हेनरी,काइल जैमीसन,बेवन जैकब्स, डेरिल मिशेल,जेम्स नीशम,ग्लेन फिलिप्स,रचिन रविंद्र, टिम रॉबिन्सन,ईश सोढी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!