उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातीलचिमूर तालुक्यातील आंबोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद १४ मार्च पासून जुनी पेन्शन लागू करण्यात यावी,याकरिता संपावर गेले असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचा शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. १४ मार्चपासूनच त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शाळा सुरू केली आहे.गावातील उच्च शिक्षित युवक-युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाते आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,यासाठी राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.अशातच शाळेतील शिक्षकवृंद संपावर गेले असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या तोंडावर शैक्षणिक नुकसान होऊ नये व संपूर्ण वर्ष वाया जाता कामा नये; यासाठी गावातील होतकरू युवक,युवती व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.