Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधवांकरीता मोफत साहित्यांचे केले जाणार वाटप

गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधवांकरीता मोफत साहित्यांचे केले जाणार वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महावीर विकलांग सेवा समिती जयपूर यांच्या सहयोगाने,जैन भवन पठानपुरा वार्ड,चंद्रपूर येथे श्री.शांतीनाथ सेवा मंडळ चंद्रपूर द्वारा २० मार्च ते २६ मार्च २०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील दिव्यांगांना पोलिओ ग्रस्तांसाठी कॅलीपर,ज्यांचे पाय कापलेले असतील त्यांचे साठी जयपूरी पाय,बगल घोडी (बैसाखी),ट्रॉयसिकल व्हिल चेअर,कर्ण यंत्र इत्यादी दिव्यांगाचे साहित्य वाटप निशुल्क करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील दिव्यांगानी याचा अवश्य लाभ घ्यावा.रुग्णांनी आपल्या सोबत पासपोर्ट फोटो व BPL कार्ड सोबत आणावे,रुग्णांनी कर्ण यंत्रासाठी डॉक्टरांचे चेकप कार्ड सोबत आणावे असे श्री. शांतीनाथ सेवा मंडळ चंद्रपूर यांनी कळीवले आहे. क्रमांक ७५८८६६००२२, ९८२२२४७३३९ यावर संपर्क साधावा.तरी जिल्हयातील सर्व गरजु दिव्यांगाना या शिबीराचे लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी संजय मीणा,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली,जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.गडचिरोली यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!