Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरअन् पोलीस अधिक्षकांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या….-दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

अन् पोलीस अधिक्षकांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या….-दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरूध्द पोलिस अधीक्षकांनी कंबर कसली असून मूल तालुक्यातील गोंडसावली गावाजवळ नदी पात्रात रेती उत्खनन सुरू असताना पोलिस अधीक्षक मुम्माका सुदर्शन हे साध्या पोषाखात तीन किमी अंतर पायदळ चालत धाड टाकून काल,गुरूवारी दिनांक -२१ मार्मच च्या मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.या कारवाईत पोकलॅन मशिन,एक बोलेरो वाहन व रेती भरलेली वाहन असा १ कोटी ५१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच

कारवाई आहे.मूल तहसीलच्या मौजा अजयपूर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात एका ट्रकमधून रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे खासगी वाहनाने एका पथकासह रेती घाटावर जाऊन पाहणी केली.यावेळी एस.पी. साध्या पोषाखात होते.रस्त्यावर संशयास्पद बोलेरो पीकअप क्रमांक एमएच ३४ बीएफ १८०९ दिसून आली.

संजय नगर निवासी चालक मोहम्मद शाहरुख इस्रायल शेख वय ३६ वर्ष, हा वाहनात बसला होता. त्याला सोबत घेऊन अंधारी नदीपात्रात गेले.येथे रेतीने भरलेले ३ हायवा ट्रक आढळून आले.पोलिस आल्याची माहिती मिळताच तीन हायवा चालकाने ट्रक नदीतमध्येच खाली केले.यावेळी हायवा ट्रक क्रमांक एम.एच. ३४ बी.जी.५८५२, एमएच ३४ बीजी ०५८५, एमएच ३४ बीजी ५८६१ तीन वाहनांची किंमत ७५ लाख रुपये, आणि २४ ब्रास रेती,रेती उत्खननसाठी वापरण्यात आलेली पोकलॅन मशीन किंमत ७० लाख रुपये, बोलेरो वाहन ५ लाख रुपये असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.मशिन चालक गोंडसावरी निवासी आकाश गावंडे अंधाराचा फायदा घेत फरार झाला.तर बोलेरो चालक मोहम्मद शाहरूख इसराईल शेख, हायवा चालक श्रावणकुमार लालुप्रसाद पाल वय २८ वर्ष, सुनील जांगडे वय ३९ वर्ष, सफन समाजपती वय ५४ वर्ष, पोकलॅनमशीन चालक आकाश विरूध्द मूल पोलिस स्टेशन येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!