Thursday, April 30, 2026
Homeभंडारा'मला तू खूप आवडतेस' असे म्हणणे तरुणाला पडले महागात….

‘मला तू खूप आवडतेस’ असे म्हणणे तरुणाला पडले महागात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- विज्ञानयुगात मोबाइल क्रांती झाल्यापासून तरुण-तरुणींच्या प्रेम प्रकरणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. व्हॉटसॲप,फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया ॲपमुळे तरुणाई पार लयाला गेली आहे.आजघडीला ती स्वप्नाळू दुनियेत जगताना दिसत आहेत.अशीच एक घटना लाखनी तालुक्यात मजनूच्या बाबतीत घडलेली आहे.

पोलिस सूत्रानुसार, लाखनी तालुक्यातील चान्ना (धानला) या गावातील युवती शेतातील काम करण्यासाठी शेताकडे जात असताना गावातीलच मजनू युवक होमदेव भागवत बांते वय २६ वर्षे हा आपल्या मोटारसायकलने गावालगतच्या नहराजवळ आला व त्या युवतीला मला तू खूप आवडतेस असे म्हणून तिला ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रपोज केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे युवती शरमल्यासारखी झाली.विनयभंग झाल्याचे तिला जाणवले.

या प्रकाराची माहिती तिने लाखनी पोलिस स्टेशनला दिली व मजनू तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली.फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!