उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांकडे ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार दाखल करुनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा कारवाई करण्यात आली नसल्याने सत्यवान रामटेके यांनी आज २ मे २०२३ रोजी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता.त्यानुसार आज सकाळ पासूनच आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला.अशातच रामटेके यांना विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला.त्यानुसार देसाईगंज आम आदमी पार्टी,पीपल्स रिपब्लिकन पार्टी गडचिरोली,देसाईगंज समाजवादी पार्टी, देसाईगंज युवक काँग्रेस पार्टी यांनी कार्यकर्त्यांना घेऊन रामटेके यांच्या आमरण उपोषणस्थळी भेट दिली व देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला; त्यानंतर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी आमरण उपोषणस्थळी भेट देऊन सत्यवान रामटेके यांनी मागणी केलेल्या मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्याने अखेर आमरण उपोषण मागे घेण्यात आला.