Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजअखेर माहिती मागविणाऱ्या अर्जदारास उर्वरित रक्कम केली परत.. -माहिती अधिकारातील माहितीचे ३...

अखेर माहिती मागविणाऱ्या अर्जदारास उर्वरित रक्कम केली परत.. -माहिती अधिकारातील माहितीचे ३ हजार भरणा केल्यावर सांगितले होते ५५० रुपये; शिवराजपुर गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर गट ग्रामपंचायतीत एका माहिती अधिकार अर्ज प्रकरणात जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)यांचा अजब-गजब कारनामा उघडकीस आला होता.शिवराजपुर गट ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या महिला ग्रामसेविका विद्या मैंद यांनी माहितीच्या अधिकारात अर्जदाराने मागितलेली माहिती न देता सुरुवातीला मागितलेल्या माहितीच्या छायांकित प्रतीसाठी १५०० पानाचे,२ रुपये प्रती पान प्रमाणे ३ हजार रुपये भरणा करण्यास सांगितले होते.त्यानुसार अर्जदाराने ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीद्वारे म्हणजेच जनरल फंडामध्ये ३ हजार रुपये रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर जनमाहिती अधिकारी असणाऱ्या विद्या मैंद यांनी अनवधानाने जादा रक्कम भरणा करण्यास सुचविण्यात आल्याचे कारण देत मागितलेल्या माहितीचे केवळ ५५० रुपये होतात म्हणून भरणा केलेली अत्तिरिक्त रक्कम परत घेऊन जावे,असे अर्जदारास कळवील्याने माहिती न देता भलताच कारभार दिसून आला होता.प्रकरणी माहिती अर्जदार सीताराम रामचंद्र सयाम यांना धक्काच बसलाच होता. अश्यातच आज,गुरुवार २२ मे रोजी माहिती अर्जदार सयाम यांना भरणा केलेल्या ३ हजार रुपये रकमेतून माहिती अर्जातील दस्तऐवजांची ५५० रुपये रक्कम कपात करून उर्वरित रक्कम २ हजार ४५० रुपये धनादेशाद्वारे परत करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?👇
सीताराम सयाम यांनी देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर गट ग्रामपंचायत येथे माहितीच्या अधिकारात १४ वा वित्त आयोग योजना(जनरल बेसीक ग्रॅन्ट)अंतर्गत झालेल्या सर्व कामाची माहिती दिनांक-१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० पर्यंत तसेच निविदा सूचना,एम.बी.व ईस्टीमेटची (अंदाजपत्रक) छायांकित प्रत इत्यादी माहिती माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून माहिती मागितली होती. अर्जदार हा बीपीएलधारक नसल्याने त्याला सुरुवातीला १५०० पानांचे ३ हजार रुपये भरणा करण्यास सांगण्यात आले होते.रक्कम भरणा केल्यानंतर तेवढी रक्कम होत नसून २७५ पानांचे ५५० रुपये होतात.असे कळविल्याने माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करून यातून पळवाटा शोधण्याचा प्रकार स्पष्टपणे दिसून आला होता. प्रकरणी या अजब-गजब कारणाम्याने माहिती अधिकार कायद्याचा फज्जा उडविण्यात आला होता. अश्यातच आता उर्वरित रक्कम तर परत करण्यात आली.मात्र,दिलेली माहिती मागितलेल्या माहिती प्रमाणे आहे की काय? याची तपासणी करणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!