Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमुलांच्या ताटातुटीने 'ती' धाय मोकलून रडली; पण रेल्वे संरक्षण दलाच्या सतर्कतेने मुलांची...

मुलांच्या ताटातुटीने ‘ती’ धाय मोकलून रडली; पण रेल्वे संरक्षण दलाच्या सतर्कतेने मुलांची पुनर्भेट झाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आई आणि तिची दोन लहान मुले रेल्वे गाडीने जनरल डब्यातून प्रवास करीत होते. प्रवासात मुलांना तहान लागल्याने मुलांची आई बॉटलमध्ये नळाचे पाणी भरण्यासाठी रेल्वे थांब्यावर उतरली.पण,नळावर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने तिला उशीर झाला.तितक्यातच गाडी सुरू झाल्याने गाडीत बसलेले दोन्ही मुले आई म्हणून हाक मारू लागले.तर मुलांची आई रडत-ओरडत गाडीच्या दिशेने धावू लागली.गाडीने वेग घेतला आणि चिमुकल्यांची आई थांबली.मुलांच्या ताटातुटीने ती धाय मोकलून रडत होती.घडलेला सर्व प्रकार पाहून अनेकांना माऊलीची दया आली.त्यातच आरपीएफच्या(रेल्वे संरक्षण दल)सतर्कतेने नागपूर स्थानकावर आई आणि मुलांची पुनर्भेट झाली.
महिला आणि तिची दोन लहान मुले २२५१२ क्रमांकाच्या कामाख्या-मुंबई कर्मभूमी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करीत होते.अश्यातच आज, गुरुवार २२ मे रोजी सकाळी ९.२४ वाजता गाडी गोंदिया स्थानकावर थांबली.मुलांना तहान लागली म्हणून त्यांची आई रेल्वे थांब्यावर (प्लॅटफॉर्म) उतरून पाणी भरायला नळाकडे गेली.मात्र तेथे असलेल्या गर्दीमुळे तिला उशीर झाला आणि गाडी पुढे निघून गेली.ती धावू लागली,पण गाडी निघून गेल्याने महिलेचा आक्रोश पाहून तेथे उपस्थित आरपीएफ जवानांनी लगेच नियंत्रण कक्षाला कळविले आणि ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत नागपूर आरपीएफला कर्मभूमी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात दोन लहान मुले प्रवास करीत आहेत व त्यांची आई गोंदियालाच राहिली असल्याची माहिती देण्यात आली.त्यानुसार हेड कॉन्स्टेबल भानसे व कॉन्स्टेबल धर्मेंद सिंग लगेच ती गाडी येणार असलेल्या प्लॅटफॉर्मवर गेले.दरम्यान,गाडी व्यवस्थापकाला या मुलांबाबत कळताच त्याने या दोघांनाही पँट्री कारमध्ये आणून बसवले होते.नागपूरला गाडी पोहचताच त्यांना आरपीएफकडे सुपूर्द करण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या गाडीने या मुलांची आई नागपुरात पोहचली.आईला पाहताच दोन्ही मुले तिला बिलगून रडू लागली.त्या मुलांचे आधारकार्ड आणि ओळखपत्र सादर केल्यानंतर चाइल्ड लाइन तसेच साक्षीदारांच्या उपस्थितीत माऊलीला तिचे चिमुकले देण्यात आली. आपली मुले भेटली म्हणून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!