Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआजपासून गडचिरोलीत राज्यातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर सुरू..

आजपासून गडचिरोलीत राज्यातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले असून आज,गुरुवार २२ मे रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.उद्घाटन सोहळा प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,प्रशांत वाघरे,योगीता पीपरे,प्रमोद पीपरे, सूरजीत रॉय,अनिल कुनघाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी सांगितले की, “गडचिरोली शहरासाठी हा मनोरंजन क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमा गृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे.” या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन, फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून या सिनेमा गृहाला मॉडेल सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमामुळे गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सोय उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हे सिनेमा थिएटर गडचिरोलीच्या सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात मानाचा तुरा ठरेल. येथे केवळ करमणूकप्रधानच नव्हे,तर सामाजिक प्रबोधन करणारे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत, जे समाजाला सकारात्मक संदेश देतील.”
मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी हे सिनेमा गृह अल्पावधीत उभे राहण्यासाठी जिल्हाधिकारी पंडा  व आमदार डॉ.नरोटे यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे नमूद केले.त्यांनी येत्या काळात इतर पूरक सुविधा लवकरच उभारण्यात येतील,असेही सांगितले.हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हवेने फुगवलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे.यामध्ये एकूण १२० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून,दररोज चार शो दाखविण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे संचालन आनंद खुने यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश ठाकरे यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!