उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज,गुरुवार २२ मे रोजी सुरू होणार होती.परंतु अकरावी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाली नाही.त्यामुळे शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार येत्या २६ मे ते ३ जूनपर्यंत अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.त्यामुळे दोन दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून चार दिवस वाट पाहावे लागणार आहे.अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश येत्या २६ मे पासून सुरू होणार आहे.तर पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हाच सुरू होणार आहे.
ऑनलाईन अकरावी प्रवेशाच्या साईटमध्ये तांत्रिक अडचण; आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

