- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गाव नजीकच्या शेतशिवारात काल,बुधवार १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आणि सिंदेवाही पोलिसांना कळवले.लागलीच
सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाची पाहणी करून परिसरातील ओळखीचा तरुण असल्यास कळविण्याचे आवाहन केले होते.प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सदर तरुण परिसरातील नसल्याचे स्पष्ट करताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला होता.सिंदेवाही पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असतांनाच तीन दिवसांपूर्वी कामाच्या शोधात निघालेला आपला मुलगा तर नसावा ना?अशी शंका मनात बाळगून पोलीस ठाण्यात धाव घेतलेल्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आणि मृताची खरी ओळख पटली.धनराज दिवाकर दांडेकर वय ३५ वर्षे,रा.नलेश्वर, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे मृतक तरुणाचे नाव असून तो तीन दिवसांपूर्वी कामाच्या शोधात घरून निघाला होता.याबाबत त्याने आपल्या आईला सांगितले होते.अश्यातच काल बुधवारी लाडबोरी शेत शिवारात त्याचा मृतदेह सापडला.
आज गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.धनराजला दारूचे व्यसन जडले होते.सदरची घटना दारूच्या नशेत तर घडली नसावी ना?असा कयास बांधला जात आहे. मात्र,मृत्यूचे खरे कारण उत्तरीय तपासणी अहवालातून स्पष्ट होणार असून तरुण वयात मुलगा हरपल्याने दांडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -

