Wednesday, August 19, 2026
Homeचंद्रपूरअखेर तीन महिलांचे बळी घेणारी वाघीण जेरबंद; ६२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा..

अखेर तीन महिलांचे बळी घेणारी वाघीण जेरबंद; ६२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील अनेक महिला टोळीने नेहमीप्रमाणे लगतच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेल्या होत्या.१० वाजताच्या सुमारास या महिला तेंदूपानांचे ओझे घेऊन घरी परत आल्या.यातील कांता बुधाजी चौधरी,शुभांगी मनोज चौधरी व रेखा शालिक शेंडे या महिला दुपार झाली,तरीही घरी न परतल्याने गावकऱ्यांनी हातात डफली घेऊन जंगल परिसरात शोध मोहीम राबवली.अशातच दोन किलोमिटर आत जंगलात गेल्यानंतर पुढील दृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता.वाघीण चक्क एका महिलेच्या अंगावर बसून मांस भक्षण करत होती.हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांनी हातातली डफली वाजवायला सुरुवात केली असता,वाघीण जंगलात पळून गेली.गावकऱ्यांच्या शोधात घटनास्थळी तिघींचेही मृतदेह आढळले.सदरची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रात शहरापासून जवळच असलेल्या जंगलात शनिवारी १० मे च्या दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.कांता बुधाजी चौधरी वय ६५ वर्षे,शुभांगी मनोज चौधरी वय २८ वर्षे व रेखा शालिक शेंडे वय ५० वर्षे,तिन्ही महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) येथील रहिवासी होत्या.त्या तेंदूपाने गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेल्या असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या.एकाच वेळी एकाच गावातील तिघींना वाघाने ठार केल्याची पहिलीच घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले ग्रामस्थांनी तात्काळ वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.त्यानुसार नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने  ६२ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला व जंगल परिसरात त्वरीत ट्रॅप कॅमेरा व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले.अखेर आज,सोमवार १२ मे रोजी सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात डोंगरगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-१३६० मध्ये पोलीस दलाचे शॉर्प शुटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत वाघिणीला डार्ट मारीत बेशुद्ध करून जेरबंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वाघिणीच्या बछड्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली असून लवकरच बछडे ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक एम.बी.चोपडे (प्रादेशिक
व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,अजय मराठे, बायोलॉजीस्ट राकेश आहुजा उपस्थित झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!